Earthquake in Beed :महाराष्ट्रात आज जसा राजकीय भूकंप झाला तसाच महाराष्ट्रात महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात आज भूकंपाचे हादरे जाणवले.
भूकंपाच्या हादरा बद्दल अधिक माहिती अशी की बीड शहरात आज रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटाला 8.25 pm दोन हादरे जाणवले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Earthquake in Beed नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आत्ताच आज महाराष्ट्राला स्पेशली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला हादरा बसला जसे की त्यांचे चिन्ह आणि पक्ष हे अजित दादाला मिळाले त्यापेक्षाही सर्वात मोठा भूकंप बीड जिल्ह्यातील नागरिकांनी आज अनुभवला आहे.
बीडमध्ये आज रात्री म्हणजेच मंगळवारी संध्याकाळी आठ वाजून पंचवीस मिनिटाला दोन हादरे बसले याचे रिश्टर स्केलवर वरती जे मोजमाप आहे ते अजून पर्यंत मिळू शकले नाही.
पण दोन मिनिटाच्या आत दोन जबर असे हजेरी आज बीड शहरातील नागरिकांनी अनुभवले आहेत.
बीडमध्ये सध्या एकंदरीत नागरिकांमध्ये भितेचं तसेच चिंतेच वातावरण दिसत आहे कारण की संध्याकाळी जेवणाच्या वेळेस हाजरी बसले त्यामुळे सगळीकडे भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.
याबद्दल लवकरच पुढील माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू
Earthquake in Beed भूकंप बद्दल अधिक माहिती:
बीड जिल्ह्याचे तहसीलदार सुहास हजारे यांनी Maha Buzz News बोलताना सांगितलं की सदरील आवाज झाल्यानंतर आम्ही राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाशी संपर्क केला असता आपत्ती व्यवस्थापन विभागाचे भूगर्भ शास्त्रज्ञ रोहन पवार म्हणाले की हा आवाज भूकंपाचा नसून त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याची गरज नाही, भूगर्भात पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर एक पोकळी निर्माण होते त्यात हवेचा दाब तयार झाल्यानंतर असे आवाज जमिनीतून येतात असेही त्यांनी सांगितले.