Manoj Jarange Patil :मराठे तहात हरले: सगे सोयरे शब्दाचा वाद: GR कि अधिसूचना

मराठे तहात हरले सगे सोयरे शब्दाचा वाद ?

शासनाने अधिसूचना काढली आणि मग मराठा समाजानं मनोज जरांगे यांचे नेतृत्वाखालील त्यांचा आंदोलन मागं घेतलं. 

मराठा समाजातून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असताना भुजबळ यांनी या अधिसूचनेला विरोध करणार अशी प्रतिक्रिया दिलेली. 

तर जितेंद्र आव्हाड म्हणाले की युद्ध जिंकले पण तहा मध्ये हरले, आणि आता समाज माध्यमात सुद्धा अशाच प्रतिक्रिया येत आहेत की मराठा युद्धामध्ये जिंकले आणि तहात मात्र हरले. 

खरंच मराठा युद्धामध्ये जिंकले आणि तहा मध्ये हरले काय आणि भुजबळांची म्हनने कितपत खरे आणि कितपत खोटे याची आज आपण सविस्तर मध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी जेव्हा लढा सुरू केला तेव्हा त्यांचा तो लढा राज्य सरकारच्या धोरण विरोधात होता पण नंतर जशी जशी या आंदोलनाची तीव्रता वाढायला लागली, मराठा समाजाच्या मागण्या या स्पष्ट व्हायला लागल्या त्यानंतर छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे असे एक वाद निर्माण झाला. 

कारण ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये अशी जाहीर भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती, आणि त्याच्यानंतर छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपित झालेल्या संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेले, आणि एकूणच परिस्थिती जी आहे यांच्यातली ही चिगळत चालली होती. 

आता मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्याचं शासनाचे म्हणणे आणि तशी अधिसूचना सुद्धा त्यांनी काढलेली आहे. या अधिसूचनेनंतर मराठा समाजातून आनंद व्यक्त केला जात असताना भुजबळांनी या अधिसूचने संदर्भात प्रतिक्रिया दिलेली. 

भुजबळ नेमके काय म्हणालेत हे आपण जाणून घेऊयात: मराठे तहात हरले

भुजबळ आज पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले की मराठा समाजाचा विजय झाला असं वाटतंय पण मला तसं वाटत नाही, आणि झुंड शाहीने नियम कायदे बदलता येत नाहीत. याच्या सोबतीने त्यांनी अजूनही काही दावे केलेले. भुजबळ यांनी सुरुवातीला स्पष्ट केलं की आम्ही मंत्रिमंडळांना शपथ घेतली आहे . फियर अँड फेवर आता ही सूचना आहे GR.16 फेब्रुवारी पर्यंत यावरती हरकती मागवण्यात आलेल्या आणि लाखोंच्या संख्येने हरकती पाठवण्याचं त्यांनी आवाहन केलेला आहे. जेणेकरून या एकूणच विषयाची दुसरी बाजू सुद्धा सरकारच्या लक्ष मध्ये येईल. 

आता हे लक्षात घ्या की सूचना आणि हरकती याच्यासाठी प्रत्येक मसुद्यामध्ये मार्ग खुला असतो. याद्वारे सरकार जाणून घेण्याचा प्रयत्न सुद्धा करत असत. भारतीय राज्यघटनेचा मसुदा सुद्धा भारतीय जनतेसाठी सूचना आणि हरकतीसाठी खुला ठेवलेला होता. याच्यामुळे ड्राफ्ट बनवणं आणि तो आणि हरकतीसाठी ओपन असणे याच्यामध्ये नवीन असं काही नाही. महत्त्वाचा मुद्दा याच्यातला हा आहे की ही सूचना आहे ठीक आहे, अध्यादेश नाही आणि याच्यामध्ये ड्राफ्ट मसुदा असा उल्लेख आहे. तो सुद्धा कच्चा मसुदाय. 

आता दुसरा मुद्दा आहे या संदर्भातला भुजबळांनी मांडला म्हणजे सगळे सोय सगळे सोयरे या शब्दावरून भुजबळ म्हणाले की सगळे सोयरे कायद्याच्या कसोटीवर अजिबात टिकणार नाही, आता हे त्यांचे वैयक्तिक मत आहे असे त्यांनी सांगितलेले माननीय न्यायालय यासंदर्भात काय निर्णय घेईल हे आपण आज तर निश्चितपणे सांगू शकणार नाही.  कारण ते न्यायालयीन प्रक्रियेचा भाग असणार आहे. 

मसुद्यास अंतिम स्वरूप प्राप्त झाल्यानंतरच हे सर्व प्रक्रिया पुढे जाऊन सुरू होऊ शकते. 

तिसरा मुद्दा जो भुजबळ यांनी मांडला तो म्हणजे EWS ए डब्ल्यू एस मधील दहा टक्के आरक्षणातील 85% वाटा जो आहे हा मराठा समाजाला मिळत होता. तो इथून पुढे मिळणार नाही आता यासंदर्भात शासनाने सुद्धा डेटा मागे जाहीर करून झालेला होता इथून पुढे त्यांना कुणबी प्रमाणपत्र जर का मिळालं तर मात्र लाभ घेता येणार नाहीये. 

कारण की कोणत्याही एकाच सवलतीचा लाभ घेता येतो एकाच वेळेस दोन तीन वेगवेगळ्या सवलतींचा लाभ घेता येत नाही. त्याच्यामुळे आता निवडावं लागणार आहे एक तर OBC ओबीसी नाहीतर EWS आणि हा फार मोठा पेच इथून पुढे असणार आहे. 

ओपन मध्ये पण क्लेम करता येणार नाही असं भुजबळ म्हणत असले तरी याच्यावरती मत मतांतर असू शकतात. कारण की (Open is Open for Everyone)ओपन इज ओपन फॉर एव्हरीवन. आता राजकीय आरक्षण यासाठी इतका इशू होणार नाही कारण की कोणीही निवडणूक लढवू शकतो-ओपनच्या जागेवरती आणि बघा फक्त आरक्षित जागेवरती ज्याच्यासाठी आरक्षण आहे त्या ठिकाणी आरक्षणास पात्र असलेली व्यक्ती ज्या ज्या व्यक्तीला आरक्षण आहे तीच फक्त निवडून येऊ शकते, किंवा निवडणुकीला उभं राहू शकते. 

नोकरीमध्ये मात्र न्यायालयाने वेळोवेळी वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत.  (Open is Open for Everyone) ओपन इज ओपन फॉर एव्हरीवन पण जर का एखाद्याने कॅटेगरीमध्ये एज रिलॅक्सेशन घेतलं वय जर का तिथे 30 सांगितलेला आहे आणि कॅटेगिरी साठी 32, 33 असे जर का मर्यादा दिलेली असेल, आणि तिथं एज रिलायन्सेशन जर का घेतलं आणि नंतर मात्र त्या उमेदवाराला ओपन चे मिळाले तर मात्र त्या उमेदवाराला कॅटेगरीमध्ये धरलं जात नाही. 

उलट ओपन कॅटेगरीच्या जर का क्रायटेरियामध्ये कोणी बसत असेल तर मात्र त्याच्यासाठी स्कोप वाढला असं सुद्धा म्हणता येईल पण तरीसुद्धा या संदर्भातील न्यायालय निर्णय बघणे अधिक योग्य राहणार आहे आणि नंतरच अंतिम मताला येणं योग्य राहील. 

चौथा मुद्दा जो भुजबळाने मांडला तो असा होता की फक्त एफिडेविड देऊन जात प्रमाणपत्र मिळणार नाही आणि हे आणि हे शासनाने सुद्धा लक्षात घेतलेला आहे म्हणूनच त्यांनी त्या अधीच सूचनेमध्ये मसुद्यामध्ये सुद्धा गृह चौकशी हा मुद्दा अगदी स्पेसिफिकली घेतलेला आहे. आताही अधिसूचनेतली तरतूद एससी एसटी या सर्वांना लागू आहे आणि याचा गैरफादा घेतला जाऊ शकतो हे सुद्धा या ठिकाणी नाकारता येणार नाहीये. 

कोणीही कोणालाही ऍफिडेविट देऊन जात प्रमाणपत्र मिळवून देऊ शकेल पण त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडीटी होणे हे फार महत्त्वाचे. म्हणजे जर का एखाद्याला वाटलं की मी तुला एफिडेविट देतो काय तू टेन्शन घेऊ नको. तर नुसता एफिडेंट देऊन विषय थांबणार नाहीये, त्याची पडताळणी होणं गरजेचं आहे. गृह चौकशीमध्ये ते सिद्ध होण सुद्धा गरजेचं आहे. 

(OBC)ओबीसीवर अन्याय आहे की मराठ्यांना फसवलं. मराठे तहात हरले

पुढचं महत्त्वाचा मुद्दा आहे की (OBC)ओबीसीवर अन्याय आहे की मराठ्यांना फसवलं असा प्रश्न भुजबळ यांनी मांडलेला दिसून येते, पण त्याचं उत्तर आजच्या दिवशी देता येणार नाही. या अधिसूचनेतील या मसुद्यातील अप्रत्यक्षपणे शब्द आहे याची येणारे काळामध्ये चिरफाड केले जाईल. 

हरकती येणार आहेत सूचना येणार आहेत नंतर त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहे, त्याच्यामुळे अन्याय आहे की फसवलं जाते याच्याविषयी स्पेसिफिक असं उत्तर आत्ता तरी देता येणार नाही. 

पुढचं महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे सरसकट गुणे मागे घेण्याचा दरवाजा आणि भुजबळाने त्याच्यावरती आक्षेप सुद्धा घेतलेला आहे पण गुन्हे मागे घ्यायचे किंवा नाही घ्यायचे हा पूर्णपणे शासन निर्णय आहे आणि या संदर्भात गृह विभाग योग्य तो निर्णय घेतो असा आज वरचा इतिहास आहे. सध्या तरी राजकीय गुन्हे मागे घेतले जाणार आहेत असं स्पष्ट होताना दिसते, सरसकट सर्व गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत राजकीय गुन्हे मात्र मागे घेतले जाणार आहेत. आणि म्हणूनच ही चर्चा जी होतीये ती होताना आपल्याला दिसते. 

मराठे तहात हरले

आता हे समजून घेऊया की मराठे तहात हरले असं का म्हटलं जाते तर, याच्यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा अध्यादेश नाही तर हा मसुदा आहे अधिसूचना असा सुद्धा शब्द याच्यासाठी वापरलेल्या अजून हा कच्चा डॉक्युमेंट आहे यासंदर्भात याच्या बाजूने सुद्धा मत नोंदवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे तोही मार्ग ओपन आहे. 

आणि ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होणार आहेत थोडक्यात काहीही यासंदर्भात होऊ शकत. 

सगे सोयरे शब्दाचा वाद ?

दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सगे सोयरे या शब्दावरून खूप मोठा खल झालेला आहे. 

आता अध्यादेश काढण्यासाठी अजून एक दिवस मराठा समाजाने शासनाला दिलेला होता पण निघाली काय तर अधिसूचना. आणि याच्यामध्ये सुद्धा सगे सोयरे याची व्याख्या केलेली आहे. तर सगे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील आजोबा पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमध्ये लग्न झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल, आणि यामध्ये सहजातीय विभागातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असणार आहे. 

म्हणजे परत वडील आजोबा पंजोबा हेच सगळं धरलेले आईकडील कागदपत्र असतील तर ती ग्राह्य धरावीत ही मागणी होती जी की मान्य झाली आहे असा पण म्हणू शकतो पण लग्न सजातीय असायला हवा, म्हणजे एकाच जातीमध्ये लग्न झालेला असावा. कुणबी कुणबीशीच असंच लग्न झालेला असावं आणि याचा पुरावा उपलब्ध करून देणे ही सुद्धा अर्जदाराची जबाबदारी आहे. हा पुरावा सुद्धा गृह चौकशी केल्यानंतरच ग्राह्य धरला जाणार आहे. ते त्या मसुदामध्ये स्पष्टपणे मांडलेला आहे. 

तुम्ही बघू शकता थोडक्यामध्ये काय आंतरजातीय जर का विवाह असेल मग तो या पिढीतला असो किंवा आधीच्या पिढीतला असो तर मात्र एकूणच त्या अर्जावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतात. 

सगळे सोयरे याची मराठा समाजाला अपेक्षित असलेली व्याख्या इथे करण्यात आलेली नाही म्हणून तहात हरले असं म्हणलं जाते. 

अजून एक मुद्दा म्हणजे प्रमाणपत्र साठी जी प्रोसेस सुद्धा ही आधी जशी होती तशीच आहे अर्जदाराचे वडील, आजोबा, काका, पुतणे, भाऊ- भाऊ थोडक्यात रक्त नात्यातील हे शब्द आधी जसे होते तस. सगळ्या सोयऱ्यांना गणगोत नोंदीचा आधार घेऊन कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार पण या संदर्भातला पुरावा हा द्यावाच लागणार. वंशावळ त्याच्या सोबतीला जोडावीच लागणार आहे, म्हणजे इथे कुठेही प्रोसेसला त्यांनी असं कट शॉर्ट करण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. 

अजून एक महत्त्वाचा मुद्दा नियम क्रमांक 16 जो अगदी बोर्ड मध्ये दिलेला आहे अर्जदारांकडून पुरवण्यात यावयाची माहिती यामध्ये काय दिलेले उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयाची साक्षांकित प्रत आणि किंवा अर्जदाराच्या रक्त संबंधातील परत शब्द काय वडिलांचे किंवा सख्या चुलत्याचे किंवा वडिलांकडे रक्त संबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र. 

आता इथे सुद्धा आपल्याला तेच शब्द दिसतात वडिलांकडे सगळे कागदपत्र लागतात आणि सगे सोयरेचा आग्रह होता तर सगळे शब्द इथे वाढवलेले पण परत एकदा सगे सोयरे व्याख्या मगाशी सांगितले तिकडेच येईल इथे आईकडील असा उल्लेख करण्यात आलेला नाहीये. आणि सगे सोयरे याचा उल्लेख आहे म्हणल्यानंतर परत सगळे मुद्दे आपल्याला पहिल्यापासून सांगावे लागतील. 

अजून एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र सध्यातरी दिल्याचं दिसत नाहीये नोंदी जर का असतील तर मात्र प्रत्येकाला प्रमाणपत्र मिळणार आहे पण नोंदी असणं फार महत्त्वाचे ज्यांचे सगे सोयरे पण नाहीत आणि नोंदी पण नाहीत त्यांचा विचार सध्या तरी या मसुद्यामध्ये केलेल्या दिसत नाहीये. 

आता येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जण या संदर्भातल्या हरकती जे आहे ते नोंदवू शकतो याच्या बाजूने सुद्धा सूचना करू शकतो आणि मग याचा ड्राफ्ट जो आहे तो फायनल केला जाणार आहे आणि मग तो मंजूर होणार आहे पण मंजूर होताना त्याच्यामध्ये नेमकं काय असेल हे आज आपण सांगू शकणार नाही. आता ही सर्व माहिती ऐकल्यानंतर तुम्ही ठरवा की मराठे युद्धात जिंकले आणि तहात हरले.

Manoj Jarange Patil | ‘मुंबईत तुम्हाला 3 कोटी मराठ्यांचा आकडा पार करुन दाखवू

Manoj jarange patil

मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय आहे कि,  मुंबईत (Mumbai March) तुम्हाला 3 कोटी (3 crore) मराठ्यांचा आकडा पार करून दाखवू असे जरांगे यांनी म्हटलेलं आहे तर मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे मुंबई विस्कळीत होऊ शकते असा शंभूराज देसाई वाटतं.

Manoj Jarange Patil
मुंबईत तुम्हाला 3 कोटी मराठ्यांचा आकडा पार करुन दाखवू

 54 Lakh लोकांना सर्वांना लगेच एका आदेशावर प्रमाणपत्र देता येत नाही असे मंत्रि शंभूराज देसाई यांनी म्हटलं फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेऊन प्रश्न मार्गी लागेल असे त्यांनी म्हटलं.

Manoj Jarange Patil मी मरणाला घाबरणारा नाही

मनोज जरांगे  पाटील म्हणाले माझे या सरकार ला एकाच सांगणे आहे कि स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेबांना तर मनातून लक्ष घालावं आणि फडणवीस साहेबांना सुद्धा मनातून लक्ष घालावे कारण मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा आणि मराठा दिसणार तुम्हाला 26 January ला 3 तीन करोड मराठा आणि फक्त मराठाच दिसणार कारण मराठ्यांनो या आणि इतक्या ताकदीने घराच्या बाहेर पडा, मी आपले लेकरं मोठे व्हावेत मनून घराच्या बाहेर पडून मारायला देखील तयार आहे , कोणाचीही भीती बाळगण्याची काहीही गरज नाही सगळ्या मराठ्यांनी बाहेर पडा आणि शक्ती दाखवा या देशाला आणि जगाला वाटलं पाहिजे असली एकजूट कधी बघितली नाही.  

https://mahabuzznews.com/manoj-jarange-patil-mumbai-: Manoj Jarange Patil | ‘मुंबईत तुम्हाला 3 कोटी मराठ्यांचा आकडा पार करुन दाखवू

शंभूराज देसाई पुढे म्हणाले:- मनोज जरांगे  पाटील  यांच्या म्हणण्यानुसार ५४ लाख लोकांना शासकीय आदेश काढून कुणबी प्रमाणपत्र दिले तर ते उद्या कोर्टात टिकू शकणार नाही उद्या कोर्टामध्ये तो टिकला नाही तर त्याचा विपरीत परिणाम 54 Lakh लोकांवर होणार आहे नुकसान कोणाचा होईल म्हणून सरकार व्यवस्थित खबरदारी सगळी घेऊन पावलं टाकताय आणि मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने यात्रा काढून मुंबईमध्ये जाऊन मुंबईच्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि येणाऱ्या लोकांची गैरसोय होणार आहे आणि फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशनोषणा मुख्यमंत्री साहेब काय तो निर्णय घेतील

Manoj Jarange Patil Mumbai: गरजवंत मराठ्यांचा मोर्चा मुंबई च्या दिशेने रवाना: कसं असणार मोर्चाचे स्वरूप ?

Manoj Jarange Patil Mumbai: गरजवंत मराठ्यांचा मोर्चा मुंबई च्या दिशेने रवाना

Manoj Jarange Patil Mumbai :- मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई ला जाणार आणि नाही मिळाले तरीही मुंबई ला जाणार अशी ठाम  भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.  लाखो मराठ्यांना सोबत घेऊन मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच परत येणार तत्पूर्वी सरकारने आरक्षण दिलं तर विजयाचा गुलाल घेऊन मुंबईला जाणार अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.  त्यामुळे सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी म्हणून मुंबईला जाणार आहे हे पक्के झाले.

 दुसरीकडे सरकारकडून सातत्याने शिस्टमंडळ पाठवून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी केली जाते आहे,  मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत,  त्यांनी मुंबईला जाण्याचा विचार पक्का केला त्यामुळे जालनातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे.

Manoj Jarange Patil

20 जानेवारीला म्हणजे शनिवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीतून या मोर्चाला सुरुवात होणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलके मोर्चा सहभागी होण्याची शक्यता आहे,  त्यामुळे मोर्चाचे स्वरूप कसं असणारे याचा मार्ग कोणता असेल प्रवासाचे टप्पे किती असतील एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांची व्यवस्था कशी केली जाणार आणि आत्तापर्यंत मोर्चासाठी काय तयारी झाली त्याची सर्व माहिती आपण या लेखातून घेणार आहोत 

Manoj Jarange Patil Mumbai- कसे असेल मोर्चाचे स्वरूप ?

तर सुरुवातीला पाहुयात मोर्चाचे स्वरूप काय असेल ते,  शनिवारी सकाळी नऊ वाजता मनोज जरांग यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात होणार आहे मोर्चात सहभागी होण्यासाठी अंतरवाली सराटीत आजूबाजूच्या गावातील लोक जमा व्हायला सुरुवात झाली आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात येतोय काल सकाळपासूनच पोलिसांच्या गाड्या आंदोलन स्थळी दाखल होत आहेत. हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी मोर्चातील स्वयंसेवकांना सूचना देण्यात आल्यात त्या अनुषंगाने तयारी सुरू आहे. 

हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार असून वाटेत एकूण सहा मुक्काम होणार आहेत तर सातवा मुक्काम मुंबई येथील आझाद मैदानावर असणार आहे.  अंतरवाली सराटीतून मोर्चा निघाल्यानंतर 20 जानेवारीला पहिला मुक्काम बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मातोरी गावाच्या डोंगर पट्ट्यात असणार आहे.  दुसरा मुक्काम अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाट परिसरात असेल तिसऱ्या दिवशी हा मोर्चा पुणे जिल्हात दाखल होईल 22 जानेवारीला तिसरा मुक्काम रांजणगाव येथे होणार आहे,  नंतर 23 जानेवारी चा चौथा मुक्काम पुण्यातील खराडी बायपास येथे असेल.

 पुणे जिल्ह्याचे सीमा ओलांडल्यानंतर पाचवा आणि सहावा मुक्काम अनुक्रमे लोणावळा आणि वाशी येथे होणार आहे त्यानंतर सातवा आणि शेवटचा मुक्का मुंबईतील आझाद मैदानावर असणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यताअसल्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर देखील लोकांची राहण्याची सोय केली जाणार आहे.

Manoj Jarange Patil Mumbai

Manoj Jarange Patil Mumbai- कधी होईल उपोषणाला सुरवात ?

 26 जानेवारी पासून म्हणून जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत मोर्चासाठी आत्तापर्यंत काय तयारी झाली  हे पाहुयात : या मोर्चासाठी एक खास ट्रक सजवला जातोय त्या ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणारे सर्व मराठा आंदोलक पायी चालणार आहेत तसेच या मोर्चा सोबत जवळपास 100 ट्रॅक्टर देखील असतील प्रत्येक ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेली असेल त्या ट्रॉलीत आंदोलकांसाठी आवश्यक असणारा सर्व दैनंदिन सामान ठेवले जाणार आहे.  त्यामध्ये धान्य स्वयंपाक बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाज्या मसाले गॅस शेगड्या, चुली पेटवण्यासाठी लाकडं अशा सर्व बाबी ठेवल्या जाणार आहेत.

100 ट्रॅक्टर बरोबर जवळपास 25 ट्रक आणि इतर शेकडो वाहनांचा देखील समावेश असेल ज्या आंदोलकांना पदयात्रेत चालणे शक्य नसेल त्यांना वाहनात बसून प्रवास करतायेईल असं नियोजन केले आहे.

या मोर्चाला पदयात्रा म्हटलं जात असला तरी अंतरवाली सराटी ते मुंबई असे सर्व अंतर पाई चालले जाणार नाहीये, दररोज सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल तंत्र बारा वाजेपर्यंत साधारणतः 12 ते 15 किलोमीटर पायी प्रवास केला जाईल त्यानंतर मनोज जरांगण सह सर्व आंदोलन आपापल्या गाड्यात बसून नियोजन स्थळी मुक्कामासाठी पोहोचणार आहेत.

प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी मराठा समाजाकडून नाष्टा आणि जेवणाची सोय केली जाणार आहे त्यासाठी अंतरवाली सराटीतून महिनाभर पुरेल इतका अन्नधान्या सोबत घेतलं जात आहे,  अन्नधान्य कमी पडलं तर मराठा बांधवांकडून धान्य पुरवला जाणार आहे, याशिवाय मोर्चा सोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनरेटरची देखील व्यवस्था केली गेली आहे. 

मोर्चा सुरू होण्यापूर्वी आंदोलकांना दिलेली सूचनावली खालील प्रमाणे:- 

  1. मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला आवश्यक असणाऱ्या वस्तू सोबत आणाव्यात 
  2. रात्री झोपताना सर्वांनी आपापल्या वाहनाजवळ झोपावं. 
  3. मुंबईला जाताना रस्त्यात कोणीही व्यसन करू नये
  4. प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम करावं 
  5. जे मुंबई पर्यंत येऊ शकणार नाहीत अशा आंदोलकांनी त्यांच्या जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत मोर्चात सहभागी व्हावं

आता पुढचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे:  हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी सरकार कडून सुद्धा उपाय योजना केल्या आहेत.  सुरक्षेसाठी सात प्रकारची सुरक्षा दल तैनात केलीआहेत यामध्ये एसआरपीएफ सीआरपीएफ रॅपिडक्शन फोर्स आणि महाराष्ट्र पोलिसांचा देखील समावेश असणार आहे.

काल सकाळपासून पोलिसांच्या गाड्या अंतरवाली सराटीत दाखल झाल्या आहेत.  सध्याच्या घडीला गावात जवळपास दीड हजार पोलीस तैनात केले आहे सरकारने मनोज जरांगे पाटील याना सुरक्षा दिलीये, तरी पण किमान दोनशे स्वयंसेवक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहेत. हे सर्व स्वयंसेवक मोर्चा व मनोज जरांगे पाटील यांच्या आसपासच असतील अशा प्रकारे सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी काय सुविधा असणार आहेत पाहुयात मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवण्यात आली या मोर्चादरम्यान म्हणून सहा ठिकाणी मुक्काम करायचा आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या राहण्याची व्यवस्था या व्हॅनिटी व्हॅन मध्ये करण्यात आली आहे.

कशी आहे व्हॅनिटी व्हॅन :- दोन कंपार्टमेंट मध्ये स्वतंत्र एसी बसवण्यात आल्या,  पहिल्या कंपार्टमेंट मध्ये सोफा ठेवण्यात आला तर दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली,  अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हन आणि चार्जिंग व्यवस्था देखील देण्यात आली आहे,  तसेच राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पाहता याव्यात यासाठी टीव्ही देखील बसवण्यात आला आहे. 

सदर व्हॅनिटी व्हॅन ही बीड मधील मराठा बांधवांकडून घेण्यात आली आहे.  मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले तेव्हा त्यांची प्रकृती नाजूक आहे त्यामुळे व्यवस्था केल्याचे बोलले जात आहे,  याशिवाय दोन दिवसांपूर्वी जरांगे यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा देखील सराव केलाय त्यामुळे मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील ट्रॅक्टर देखील चालवण्याची शक्यता आहे.  

मराठा मोर्चाच्या अनुषंगाने सर्वच पातळ्यांवर जोरदार तयारी केली जाते त्यामुळे मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता हा आकडा नेमका किती असू शकतो  हे पाहावं लागणार आहे!