Maratha Aarakshan Mumbai March साठीच्या मोर्चाचा तिसरा दिवस,गर्दी किती, काय घडतयं- Manoj Jarange Patil

Maratha Aarakshan Mumbai March: आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही मी असेल नसेल माहित नाही अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत  मनोज जरांगे पाटील उपोषण करण्यासाठी मराठा समाजाला सोबत घेऊन मुंबई मोर्चा वर निघालेत.

20 जानेवारीला या मोर्चाची सुरुवात आंतरवाली सराटीपासून झाली. 

आज मोर्चाचा तिसरा दिवस:  

(3 Crore )तीन करोड मराठा समाज मुंबईच्या आजाद मैदानावर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी काही दिवसांपूर्वी दिला होता हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईच्या आजाद मैदानावर पोचणार आहे. 

मुंबईत पोहोचल्यावर आरक्षणासाठी जरांगे आमरण उपोषण करणार आहेत,  आता हळूहळू या मोर्चात मराठा बांधव मोठ्या प्रमाणात सामील होत असून मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सकाळी दहा वाजता माथुरी गावातून निघालेले मनोज जरांगे पाटील रात्री उशिरा बारा बाभळी येथे पोहोचले. 

मुंबईच्या दिशेने मोर्चेकरांनी निघू नये यासाठी शेवटपर्यंत सरकारचे शिस्टमंडळ प्रयत्न करत होते अगदी बच्चू कडू मुख्यमंत्र्यांचे ODS मंगेश चिमटे यांचे प्रयत्न चालू होते पण सरकार वेळ काढूपणा करतय.

54 लाख कुणबी नोंदी सापडल्या 

अशी बातमी Maratha Reservation March आंदोलना अगोदर आली. जेवढ्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश महसूल विभागाचे मुख्य सचिवांकडून देण्यात आले.  

प्रमाणपत्र देण्यासाठी विशेष शिबिर आयोजित करण्याचे देखील आदेश देण्यात आलेत,  कुणबी प्रमाणपत्र देण्याची सुरुवात देखील झाली आहे मात्र हे दाखले वीस तारखेपर्यंत देण्याचा अल्टिमेटम जरांगेचा होता तो आता संपलाय.

मोर्चाच्या पहिल्या दिवशी नेमका काय घडलं

आता  20 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता आंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील हजारोंच्या संख्येने मुंबईकडे निघाले त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन देखील सज्ज करण्यात आलं होतं. 

पोलिसांचा सगळा बंदोबस्त वडीगोद्री फाटा येथे लावण्यात आला होता मात्र मुंबईला निघण्यापूर्वी जरांगे पाटलांनी आंतरवाली सराटी मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती दरम्यान यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील भावुक झाल्याचे पाहायला मिळालं आपल्या भावना व्यक्त करताना जरांगे भर पत्रकार परिषदेत रडल्याचे देखील पाहायला मिळालं.

मी तुमच्यात असेल नसेल माहित नाही अशा शब्दात त्यांनी हा लढा सुरूच ठेवण्याचे निर्देश दिलेत.

त्यावेळी होमगार्ड राज्य राखीव पोलीस दलाचे जवान शीघ्रकृती दलाचे जवानाचे सुमारे दीड हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त राज ठिकठिकाणी लावण्यात आला होता.

शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या पत्नी वडील त्यांचा मुलगा व मुलगी देखील त्यांच्यासोबत शहागड पर्यंत या यात्रेत पाई चाललेत.सात महिने झाले तरी जरांगे पाटील घरी आले नसल्याने कुटुंबाला अश्रू अनावर झाले आता तरी हा लढा लवकर संपवा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी यावेळी केली. 

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन जरांगे पाटलांनी आपल्या मोर्चाला सुरुवात केली पहिल्या दिवशी विरोधी पक्ष असणारा शरद पवार गटातील राजेश टोपे देखील मोर्चा मध्ये सहभागी झाले होते. 

महाकाळ येथे पोहोचतात सुवासिनी त्यांचा औक्षण केला पहिल्या दिवशी हा मोर्चा माथुरी(मूळगावी Mathori) या गावात मुक्काम होता. 

मध्यरात्री जरांगे पाटलांनी यांच्या माथुरी(मूळगावी ) भव्य स्वागत झाल्यानंतर आमदार बच्चू कडू देखील माथुरी(मूळगावी )  गावात पोहोचले होते.  यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जेवण केलं. 

थोडक्यात बच्चू कडू यांनी जरांग यांच्या पदयात्रेतील एक प्रकारे पाठिंबा दर्शवला.

मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं

माथुरी(मूळगावी ) मधून ही पदयात्रा नगर जिल्ह्याकडे निघाली त्यानंतर यात्रा पाथर्डी रोडने अहमदनगर येथे निघाली या यात्रेपूर्वी जरांगे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी सरकारला थेट इशारा दिला. 

“आमच्या नोंदी सापडल्यास त्यांनी मराठ्यांचे ताकद पहिले असेल मराठा समाजाचा हा शेवटचा लढा आहे दोन दिवस वाट पाहणार अन्यथा त्यांनी आमच्या गावात येऊ नये. मुंबईला येऊ नका असे कसे म्हणतात दादागिरी ची भाषा करू नये 26 जानेवारी च्या आधी तोडगा काढा असं जरांगे म्हणाले” 

नगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे फटाके वाजवून महिलांनी औक्षण करून जंगी स्वागत झालं. त्यानंतर संध्याकाळी ही पदयात्रा बारा बाभळी येथे पोहचली. बारा बाभळी येथे अहमदनगर सकल मराठा समाजाच्या वतीने संध्याकाळी सात वाजता भव्यसभा आयोजित करण्यात आली होती,  दिवसभराचा बारा बाभळी ते रांजणगाव असा प्रवास करून सोमवारी सकाळी नऊ वाजता जरांगे निघाले असून सुपा येथे दुपारचे जेवण करून रांजणगाव येथे मुक्काम करणार आहेत. 

मुस्लिम मदरसाने दिली 85 एकर जागा

महत्त्वाचे घटना म्हणजे मराठा समाजाचा मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लिम समाजाने मदरशाची 85 एकर जागा दिली होती बारा बाभळी येथे दीडशे एकरवर मुक्कामाची व्यवस्था होती त्यापैकी 85 एकर जागाही मदरशाची होती. 

या जागेत जरांगे यांनी दुसऱ्या दिवशी मुक्काम देखील केला जागा उपलब्ध करून देण्यास सोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी यावेळी पदयात्रेत सहभागी मराठा बांधवांची सेवा देखील केली. 

याशिवाय यावेळी परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली होती. 

मोर्चाच्या तिसरा दिवशी नेमकं काय घडलं

सोमवार या पदयात्रेचा तिसरा दिवस तिसऱ्या दिवशी बारा बाभळी सकाळी नऊ वाजता निघालेले जरांगे दुपारी सुपा येथे पोहोचले. 

या दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस छगन भुजबळ वर टीका करण्याबरोबरच त्यांनी मुस्लिम आणि धनगर समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणार असल्याचे देखील सांगितलं. 

कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आपण माघार घेणार नाही असा इशारा दिल्यानंतर बारा बाभळी सकाळी नऊ वाजता निघालेले जरांगे सोमवारी दुपारी नगर येथे पोहोचले आता जरा मोर्चा नगर मधून निघाला असून नगर असता भागात चौक बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

या पदयात्रेत लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले ते व्हिडिओ सध्या पुढे येतात.

कशी आहे पुणे पोलिसांची मोर्चाची तयारी

या मोर्चाचा पुढचा मुक्काम पुण्यात असल्याने पुणे पोलिसांनी देखील सुरक्षेची तयारी केली मंगळवारी पुण्यातील खराडी परिसरात पदयात्रेचा मुक्काम असणारे त्यामुळे 1000 पोलीस राज्य राखीव पोलीस(Reserve police force RPF) दलाच्या दोन तुकड्या दंगल नियंत्रण पथक गृहरक्षक दलाच्या 800 जवान बंदोबस्तासाठी तैनात राहणार असल्याची माहिती समोर आली. 

मंगळवारी मराठा समाजाचा मोर्चा खराडी वाघोली परिसरात आर के फार्मचा मोकळ्या जागेत मुक्कामी राहणार. तेथे एक हजार स्वच्छतागृह, रुग्णवाहिका, शंभर पाण्याचे टँकर, आरोग्य सुविधा, उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. 

एकीकडे मनोज जरांगे पाटील मोर्चा आक्रमक होत असताना दुसरीकडे सरकारकडून मात्र वारंवार जरांगेंना मुंबईला न येण्याचा आवाहन केले जाते.

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? 

“जरांगे पाटील यांनी आंदोलन थांबवलं पाहिजे त्यांनी सुरू केलेल आंदोलन टाळलं पाहिजे आंदोलनाचा जनतेला त्रास होतोय. आम्ही मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी बैठक घेतली त्या बैठकीला सर्व अधिकारी होते गोखले इन्स्टिट्यूट चे प्रतिनिधी होते, मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेण्यात येणारे त्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला जाईल.” 

दुसरीकडे मुंबईच्या आजाद मैदानावर होणाऱ्या मराठा समाजाच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या 28 तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याचे देखील माहिती समोर आली. मोर्चाला मुंबईत जाण्यापासून सरकार रोखू शकेल का हा मोर्चा महाराष्ट्रातला राजकारण होऊन टाकेल का आणि नेमकं पुढे या मोर्चाचं काय होईल 

पुढे वाचा

mahabuzznews.com

View Comments

Recent Posts

Post Office Time Deposit Scheme 2024: जानिए क्या होंगे ब्याज दर, पात्रता और लाभ

Post Office Time Deposit Scheme 2024: इंडिया पोस्ट द्वारा पेश किए जाने वाले सबसे प्रसिद्ध… Read More

8 months ago

Post Office RD Scheme 1000 Per Month: बहुत बढ़िया है ये स्किम, अब हर महीने निवेश पर मिलेगा शानदार रिटर्न

Post Office RD Scheme 1000 Per Month: सुरक्षित निवेश के साथ बेहतरीन रिटर्न देने के… Read More

8 months ago

MP Berojgari Bhatta Yojana 2024: रजिस्ट्रेशन, ऑनलाइन एप्लीकेशन कैसे करे

MP Berojgari Bhatta Yojana 2024: जैसा कि आप सभी जानते हैं हमारे देश में बेरोजगारी… Read More

8 months ago

अपने वाहन (Car, Bike) के लिए PUC Certificate कैसे प्राप्त करें 2024

PUC Certificate: भारत में Car, Motorcycles या किसी अन्य प्रकार के वाहन को कानूनी रूप… Read More

8 months ago

Post Office PPF Account 2024: ऑनलाइन कैसे खोलें, ब्याज दर, पात्रता

Post Office PPF Account 2024: भारत के सबसे बड़े और सबसे पुराने संस्थानों में से… Read More

8 months ago

MP Scholarship Portal 2.0: Registration और Login, ट्रैक स्थिति, e-kyc

MP Scholarship Portal 2.0: मध्य प्रदेश सरकार एक ऑनलाइन पोर्टल लेकर आई है जिसके माध्यम… Read More

8 months ago