Manoj Jarange Patil Mumbai :- मराठा आरक्षण मिळाले तरी मुंबई ला जाणार आणि नाही मिळाले तरीही मुंबई ला जाणार अशी ठाम भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. लाखो मराठ्यांना सोबत घेऊन मुंबईला जाणार आणि आरक्षण घेऊनच परत येणार तत्पूर्वी सरकारने आरक्षण दिलं तर विजयाचा गुलाल घेऊन मुंबईला जाणार अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. त्यामुळे सरकारने कोणताही निर्णय घेतला तरी म्हणून मुंबईला जाणार आहे हे पक्के झाले.
दुसरीकडे सरकारकडून सातत्याने शिस्टमंडळ पाठवून मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी केली जाते आहे, मात्र मनोज जरांगे पाटील आपल्या निर्णयावर ठाम आहेत, त्यांनी मुंबईला जाण्याचा विचार पक्का केला त्यामुळे जालनातील अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटलांच्या मुंबई मोर्चाच्या जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे.
20 जानेवारीला म्हणजे शनिवारी सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीतून या मोर्चाला सुरुवात होणार आहे लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलके मोर्चा सहभागी होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मोर्चाचे स्वरूप कसं असणारे याचा मार्ग कोणता असेल प्रवासाचे टप्पे किती असतील एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या आंदोलकांची व्यवस्था कशी केली जाणार आणि आत्तापर्यंत मोर्चासाठी काय तयारी झाली त्याची सर्व माहिती आपण या लेखातून घेणार आहोत
Manoj Jarange Patil Mumbai- कसे असेल मोर्चाचे स्वरूप ?
तर सुरुवातीला पाहुयात मोर्चाचे स्वरूप काय असेल ते, शनिवारी सकाळी नऊ वाजता मनोज जरांग यांच्या नेतृत्वात मोर्चाला सुरुवात होणार आहे मोर्चात सहभागी होण्यासाठी अंतरवाली सराटीत आजूबाजूच्या गावातील लोक जमा व्हायला सुरुवात झाली आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात येतोय काल सकाळपासूनच पोलिसांच्या गाड्या आंदोलन स्थळी दाखल होत आहेत. हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी मोर्चातील स्वयंसेवकांना सूचना देण्यात आल्यात त्या अनुषंगाने तयारी सुरू आहे.
हा मोर्चा 26 जानेवारीला मुंबईत पोहोचणार असून वाटेत एकूण सहा मुक्काम होणार आहेत तर सातवा मुक्काम मुंबई येथील आझाद मैदानावर असणार आहे. अंतरवाली सराटीतून मोर्चा निघाल्यानंतर 20 जानेवारीला पहिला मुक्काम बीड जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मातोरी गावाच्या डोंगर पट्ट्यात असणार आहे. दुसरा मुक्काम अहमदनगर जिल्ह्यातील करंजी घाट परिसरात असेल तिसऱ्या दिवशी हा मोर्चा पुणे जिल्हात दाखल होईल 22 जानेवारीला तिसरा मुक्काम रांजणगाव येथे होणार आहे, नंतर 23 जानेवारी चा चौथा मुक्काम पुण्यातील खराडी बायपास येथे असेल.
पुणे जिल्ह्याचे सीमा ओलांडल्यानंतर पाचवा आणि सहावा मुक्काम अनुक्रमे लोणावळा आणि वाशी येथे होणार आहे त्यानंतर सातवा आणि शेवटचा मुक्का मुंबईतील आझाद मैदानावर असणार आहे. मोर्चात मोठ्या संख्येने लोक येण्याची शक्यताअसल्यामुळे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर देखील लोकांची राहण्याची सोय केली जाणार आहे.
Manoj Jarange Patil Mumbai- कधी होईल उपोषणाला सुरवात ?
26 जानेवारी पासून म्हणून जरांगे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत मोर्चासाठी आत्तापर्यंत काय तयारी झाली हे पाहुयात : या मोर्चासाठी एक खास ट्रक सजवला जातोय त्या ट्रकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणारे सर्व मराठा आंदोलक पायी चालणार आहेत तसेच या मोर्चा सोबत जवळपास 100 ट्रॅक्टर देखील असतील प्रत्येक ट्रॅक्टरला ट्रॉली जोडलेली असेल त्या ट्रॉलीत आंदोलकांसाठी आवश्यक असणारा सर्व दैनंदिन सामान ठेवले जाणार आहे. त्यामध्ये धान्य स्वयंपाक बनवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भाज्या मसाले गॅस शेगड्या, चुली पेटवण्यासाठी लाकडं अशा सर्व बाबी ठेवल्या जाणार आहेत.
100 ट्रॅक्टर बरोबर जवळपास 25 ट्रक आणि इतर शेकडो वाहनांचा देखील समावेश असेल ज्या आंदोलकांना पदयात्रेत चालणे शक्य नसेल त्यांना वाहनात बसून प्रवास करतायेईल असं नियोजन केले आहे.
या मोर्चाला पदयात्रा म्हटलं जात असला तरी अंतरवाली सराटी ते मुंबई असे सर्व अंतर पाई चालले जाणार नाहीये, दररोज सकाळी नऊ वाजता पदयात्रेला सुरुवात होईल तंत्र बारा वाजेपर्यंत साधारणतः 12 ते 15 किलोमीटर पायी प्रवास केला जाईल त्यानंतर मनोज जरांगण सह सर्व आंदोलन आपापल्या गाड्यात बसून नियोजन स्थळी मुक्कामासाठी पोहोचणार आहेत.
प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी मराठा समाजाकडून नाष्टा आणि जेवणाची सोय केली जाणार आहे त्यासाठी अंतरवाली सराटीतून महिनाभर पुरेल इतका अन्नधान्या सोबत घेतलं जात आहे, अन्नधान्य कमी पडलं तर मराठा बांधवांकडून धान्य पुरवला जाणार आहे, याशिवाय मोर्चा सोबत पिण्याच्या पाण्याचे टँकर आणि जनरेटरची देखील व्यवस्था केली गेली आहे.
मोर्चा सुरू होण्यापूर्वी आंदोलकांना दिलेली सूचनावली खालील प्रमाणे:-
- मोर्चामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येकाने स्वतःला आवश्यक असणाऱ्या वस्तू सोबत आणाव्यात
- रात्री झोपताना सर्वांनी आपापल्या वाहनाजवळ झोपावं.
- मुंबईला जाताना रस्त्यात कोणीही व्यसन करू नये
- प्रत्येकाने स्वयंसेवक म्हणून काम करावं
- जे मुंबई पर्यंत येऊ शकणार नाहीत अशा आंदोलकांनी त्यांच्या जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत मोर्चात सहभागी व्हावं
आता पुढचा मुद्दा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची सुरक्षा व्यवस्था कशी असणार आहे: हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी सरकार कडून सुद्धा उपाय योजना केल्या आहेत. सुरक्षेसाठी सात प्रकारची सुरक्षा दल तैनात केलीआहेत यामध्ये एसआरपीएफ सीआरपीएफ रॅपिडक्शन फोर्स आणि महाराष्ट्र पोलिसांचा देखील समावेश असणार आहे.
काल सकाळपासून पोलिसांच्या गाड्या अंतरवाली सराटीत दाखल झाल्या आहेत. सध्याच्या घडीला गावात जवळपास दीड हजार पोलीस तैनात केले आहे सरकारने मनोज जरांगे पाटील याना सुरक्षा दिलीये, तरी पण किमान दोनशे स्वयंसेवक मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेची काळजी घेणार आहेत. हे सर्व स्वयंसेवक मोर्चा व मनोज जरांगे पाटील यांच्या आसपासच असतील अशा प्रकारे सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे.
या व्यतिरिक्त मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी काय सुविधा असणार आहेत पाहुयात मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी खास व्हॅनिटी व्हॅन सज्ज ठेवण्यात आली या मोर्चादरम्यान म्हणून सहा ठिकाणी मुक्काम करायचा आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या राहण्याची व्यवस्था या व्हॅनिटी व्हॅन मध्ये करण्यात आली आहे.
कशी आहे व्हॅनिटी व्हॅन :- दोन कंपार्टमेंट मध्ये स्वतंत्र एसी बसवण्यात आल्या, पहिल्या कंपार्टमेंट मध्ये सोफा ठेवण्यात आला तर दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये झोपण्याची व्यवस्था करण्यात आली, अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हन आणि चार्जिंग व्यवस्था देखील देण्यात आली आहे, तसेच राज्यात सुरू असलेल्या घडामोडी पाहता याव्यात यासाठी टीव्ही देखील बसवण्यात आला आहे.
सदर व्हॅनिटी व्हॅन ही बीड मधील मराठा बांधवांकडून घेण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दोन वेळा आमरण उपोषण केले तेव्हा त्यांची प्रकृती नाजूक आहे त्यामुळे व्यवस्था केल्याचे बोलले जात आहे, याशिवाय दोन दिवसांपूर्वी जरांगे यांनी ट्रॅक्टर चालवण्याचा देखील सराव केलाय त्यामुळे मोर्चा दरम्यान मनोज जरांगे पाटील ट्रॅक्टर देखील चालवण्याची शक्यता आहे.
मराठा मोर्चाच्या अनुषंगाने सर्वच पातळ्यांवर जोरदार तयारी केली जाते त्यामुळे मोर्चात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची शक्यता हा आकडा नेमका किती असू शकतो हे पाहावं लागणार आहे!
2 thoughts on “Manoj Jarange Patil Mumbai: गरजवंत मराठ्यांचा मोर्चा मुंबई च्या दिशेने रवाना: कसं असणार मोर्चाचे स्वरूप ?”