एक मराठा लाख मराठा म्हणत असंख्य मराठा समाज आणि जरंगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.
20 जानेवारीला अंतरवाली सराटी इथून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण पायी दिंडी सुरू झाली. पाटील यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण पायी दिंडी सुरु झाली होती,
आज या दिंडीचा पाचवा दिवस आहे आज दिंडी पुण्यातून जाती आहे त्यांचा आजचा मुक्काम लोणावळ्याला असणार.26 जानेवारी पासून मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत.
जसा जसा हा मोर्चा पुढे जातोय दिवसागणित या मोर्चात लोकांची संख्या वाढतीच आहे पण या सगळ्यात वाखाणण्याजोगी गोष्ट आहे ती म्हणजे मोर्चाचे नियोजन.
मागे जेव्हा मराठा समाजाचे लाखोंचे 58 मोर्चे निघाले होते तेव्हा देखील अशाच पद्धतीची शिस्तबद्धता दिसून आली होती. मात्र सगळ्यांना प्रश्न पडलाय.
Manoj Jarange Patil Live Pune मोर्चाचा आयोजन करताय कोण?
आंतरवाली मध्ये जेव्हा भव्य सभा झाली तेव्हा या सभेच्या आयोजनावर देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तशाच पद्धतीचे नियोजन सध्या सुरू असल्याचं दिसून येत आहे.
ठीक ठिकाणी मुक्कामाची सोय हजारो भाकऱ्या पाण्याच्या बाटल्या ते झोपण्याची व्यवस्था आणि शिस्तबद्ध वाटचाल हे सगळं कोण करतय.
मनोज जरांगे पाटील यांच्या पायी दिंडीचे आयोजन कशाप्रकारे सुरू आहे त्याबद्दलच माहिती घेऊयात.
मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळावेत आणि त्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील सप्टेंबर महिन्यापासून आंदोलन करत आहेत.
त्यांच्या आंदोलनाचे आतापर्यंत जवळपास तीन टप्पे पार पडलेले आहेत आंदोलन सध्या चौथ्या टप्प्यात आहे.
शिंदे समितीला 54 लाख कुणबी नोंदी मिळालेल्या आहेत त्या सर्वांना आणि त्यांच्या परिवाराला तसेच त्यांच्या नातेवाईकांना लगेच कुणबी प्रमाणपत्र द्यावीत या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पायी दिंडीचे आयोजन केलेल आहे.
Manoj Jarange Patil Live Pune कसे होते मोर्चाचे नियोजन ?
त्यानुसार 20 जानेवारीला ही पायी दिंडी सुरु झाली होती त्याआधी 28 डिसेंबरला पायी दिंडी कशी असेल याबाबत जरांगे पाटलांनी भूमिका मांडली होती. जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला महत्त्वाचा आवाहन केलं होतं.
राज्यभरातून मुंबई आंदोलनासाठी दाखल होताना काय काय घेऊन यावं याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी नागरिकांना आवाहन केलं होतं आपण आहोत.
तोपर्यंत आपल्या मराठ्यांच्या मुलांना आरक्षण द्यायचे सर्वांना हात जोडून विनंती आहे घरी राहू नका नियोजनाचे पीडीएफ बनवून सर्व मराठा बांधवांना देणार.
“हे सर्व नियोजन लिहिण्यात दोन रात्री घालवलेल्या आहेत हे सर्व नियोजन मी स्वतः दोन रात्र जागून केलेल्या त्यामुळे आता कोणीही माघार घ्यायचे नाही” अशी भावनिक साथ जरांगे पाटलांनी घातली होती.
ते पुढे असे देखील म्हणाले होते की मी शंभर टक्के मुंबईला जाणार. आपल्या पोरांना मोठं करायची हीच वेळ आहे आपण आहोत तोपर्यंत आरक्षण मिळवून देऊ.
कोणीही गट तट ठेवू नका एवढ्या वेळेस मराठा म्हणून भाऊ म्हणून एकत्र या ही संधी पुन्हा येणार नाही.
मुंबईच्या समाज बांधवांची आम्हाला मदत पाहिजे सर्व जाती धर्मातील बांधवांनी आम्हाला साथ द्या.
रस्त्यामधील जे गाव आहेत त्या गावांनी शक्य असेल तर पाणी आणि इत्यादींची सोय करावी अस आवाहन जरांगे पाटलांनी केलं होतं.
आता जेव्हाही पायी दिंडी पुढे जातीय तेव्हा लोक या आव्हानाला साथ देत असल्याचे दिसून येत आहे
सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचे जेवण आणि मुक्काम असं सगळं नियोजन समाज बांधव स्वतः करतात.
16 जानेवारीला जरांगे पाटलांनी पायी दिंडीचा मार्ग कोणता असेल मुक्काम कुठे असेल दुपारचे जेवण कुठे घेणार असे सगळे वेळापत्रक जाहीर केलं होतं.
त्यानंतर हे वेळापत्रक समाज बांधवांना देण्यात आलं त्यानुसार जिथे मुक्कामे जिथे दुपारच्या जेवणाचे ठिकाणे अशा ठिकाणचे समाज बांधव स्वतः पुढाकार घेऊन जेवणाची मुक्कामाची नाष्टाची स्वतः सोय करतात.
या सगळ्या आंदोलनात देणगा देणाऱ्यांची संख्या देखील कमी नाहीये देण्या फक्त पैशाच्या स्वरूपात नाहीयेत तर पिण्याचा पाणी चहा, नाश्ता, जेवण, मुक्कामाची व्यवस्था.
आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांची सेवा करून लोक आपला सहभाग नोंदवतात.
मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम मातोरी या गावी होता आजूबाजूच्या जवळपास 100 गावांनी आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती.
जेवणात पिठलं भाकरी, शेंगदाण्याची चटणी, ठेचा, भाकर, भात, पोळी, खारी, बुंदी, लाडू अशी सोय होती. त्यामुळे आंदोलनात सहभागी होणाऱ्या आंदोलकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी समाज बांधव घेतायत.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी मराठा समाजाच्या मुक्कामाच्या व्यवस्थेसाठी मुस्लिम समाजांना मदरशाची 85 एकर जागा दिली होती. बारा बाभळीत दीडशे एकर वर मुक्कामाचे व्यवस्था होते तापी की 85 एकर जागा ही मदरशाची होती. जागा उपलब्ध करून देण्यासोबतच मदरशातील साडेतीनशे विद्यार्थ्यांनी यावेळी पदयात्रेत सहभागी मराठा बांधवांची सेवा केली.
याशिवाय या परिसरात भगवे झेंडे लावण्यासाठी देखील परवानगी देण्यात आली होती जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासोबतच धनगर आणि मुस्लिम आरक्षणाला देखील पाठिंबा दिल्यानंतर मध्यंतरी पाहायला मिळालं होतं.
Manoj Jarange Patil Live Puneमोर्चाला मिळतोय इतर समाजांकडून पाठिंबा
त्यावेळी केवळ मराठा समाजच नाही तर इतर समाजाकडूनही मनोज जरांगेंच्या या पदयात्रेला पाठिंबा मिळताना दिसतोय मुंबईला निघताना स्वतःची सोय स्वतः करून निघायचं अशा सूचना आंदोलकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार आंदोलन आपल्या गाडीत जेवण बनवण्याचं सगळं साहित्य घेऊन निघालेले आहेत. त्यांच्या गाडीत महिनाभर पुढे एवढं राशन आहे पण आतापर्यंत त्यांना कुठेही स्वतःच राशन वापरण्याची गरज पडलेली नाहीये, कारण रस्त्यावर समाज बांधवांकडून त्यांची सेवा केली जाते रस्त्यावर थांबून लोक आंदोलकांना पाणी बॉटल चहा नाश्ता जेवण घेण्याची विनंती करत असल्याचं सहभागी आंदोलन सांगतात यांच्या अवतीभवती सुद्धा गर्दी होऊ नये मीडियाला त्यांच्या मुलाखती घेता याव्यात यासाठी मराठा बांधव स्वतःहून पुढे येऊन कड तयार करतात.
तसेच महिलांचे अचानक खूप महिला जरांग्यांच्या अवतीभवती जमा होऊ नयेत म्हणून महिलांनी देखील कडं केलेलं पाहायला मिळते महिला सकाळपासून उभ्या राहून त्यांना औक्षण करतात एवढ्या मोठ्या नियोजनासाठी कोणतीही टीम कार्यरत नाहीये आम्ही कोणतीही टीम तयार केलेली नाही असं स्वतः जरांगे पाटलांनी सांगितले यापूर्वीचा अनुभव पाहता टीम तयार केली की समाजात फूट पडते असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळे आतापर्यंत झालेले दौरे सभा हे सगळं समाजाच्या सहकार्याने पार पडतय याशिवाय मराठा स्वयंसेवक स्वतः गाडी पार्किंग गाडी काढून देणे ट्राफिक नियोजन कोणाला काही मदत लागली तर त्याची काळजी घेतायेत त्यामुळे हे आंदोलन शांततेत आणि शिस्तीत सुरू असल्याचे दिसून येतंय कोणत्याही ठिकाणी गर्दी होऊन लोकांना त्रास होईल किंवा पोलीस प्रशासनाला त्रास होईल अशी गोष्ट घडल्याचं दिसत नाहीये बाकी तुमच्या पायी दिंडी बद्दलचे अनुभव आणि प्रतिक्रिया नक्की शेअर करा आणि अशा