IND vs NZ U19 Sarafraj Khan brother Mushir Khan : अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा न्यूझीलंडचा सामना झाला. सुपर सिक्सचा हा सामना ब्लोमफॉन्टेन येथील मॅनगाँग ओव्हल येथे खेळला गेला. भारतीय संघाने आपले सर्व गटस्तरीय सामने जिंकले होते. त्याचबरोबर न्यूझीलंडने गटस्तरावर तीनपैकी दोन जिंकले होते. त्यांना पाकिस्तानविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाने विजयाची घोडदौड कायम ठेवली आहे. त्यांनी न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला.
भारताने आपल्या सुपर सिक्स गट-1 सामन्यात न्यूझीलंडचा 214 धावांनी पराभव केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या. मुशीर खानने १३१ धावांची खेळी केली होती. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघ 28.1 षटकांत 81 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून कर्णधार ऑस्कर जॅक्सनने (19) सर्वाधिक धावा केल्या. भारताकडून सौमी पांडेने चार विकेट घेतल्या. तर मुशीर खान आणि राज लिंबानी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. तर नमन तिवारी आणि अर्शीन कुलकर्णी यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
ND vs NZ : भारताने 295 धावा केल्या भारताने न्यूझीलंडसमोर 296 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत आठ गडी गमावून 295 धावा केल्या. मुशीर खानने १३१ धावांची खेळी केली. तर, आदर्श सिंगने 52 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मेसन क्लार्कने सर्वाधिक चार विकेट घेतल्या.
भारतीय डाव: टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. अर्शीन कुलकर्णी नऊ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आदर्शने मुशीरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ७७ चेंडूत ७७ धावांची भागीदारी केली. आदर्श ५८ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ५२ धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार उदय सहारनने मुशीरसोबत ८७ धावांची भागीदारी केली.
मोठ्या फटकेबाजीमुळे उदयने आपली विकेट गमावली. तो 34 धावा करून बाद झाला. यानंतर ठराविक अंतराने विकेट पडत राहिल्या. अरावेली अवनीश १७ धावा करून बाद झाले, प्रियांशू मोलिया १० धावा, सचिन दास १५ धावा करून बाद झाले. दरम्यान, मुशीर खानने शतक झळकावले. त्याचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक ठरले. तो सध्या या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने चार सामन्यांच्या चार डावात 81.25 च्या सरासरीने 325 धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतके आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.
यापूर्वी त्याने बांगलादेशविरुद्ध तीन धावा, आयर्लंडविरुद्ध ११८ धावा आणि अमेरिकेविरुद्ध ७३ धावा केल्या होत्या. या सामन्यात तो 126 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 131 धावा करून बाद झाला. मुरुगन अभिषेक चार धावा करून बाद झाला. तर नमन तिवारी तीन धावा करून नाबाद राहिला आणि राज लिंबानी दोन धावा करून नाबाद राहिला. मेसन क्लार्कने चार विकेट घेतल्या. तर रेयार सोर्गस, इवाल्ड श्रुडर, जॅक कमिंग आणि ऑलिव्हर टेवाटिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
सरफराज खानचा धाकटा भाऊ मुशीर खान अंडर-19 विश्वचषकात आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर-सिक्स सामन्यात त्याने शतक झळकावले. त्याने 109 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. मुशीरचे या स्पर्धेतील हे दुसरे शतक आहे. यापूर्वी त्याने 118 धावांची इनिंग खेळली होती. सरफराजची नुकतीच इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. भारताने 43 षटकात 4 विकेट गमावत 231 धावा केल्या आहेत. सध्या प्रियांशु मोलिया मुशीरसोबत क्रीजवर आहे.
Post Office Time Deposit Scheme 2024: इंडिया पोस्ट द्वारा पेश किए जाने वाले सबसे प्रसिद्ध… Read More
Post Office RD Scheme 1000 Per Month: सुरक्षित निवेश के साथ बेहतरीन रिटर्न देने के… Read More
MP Berojgari Bhatta Yojana 2024: जैसा कि आप सभी जानते हैं हमारे देश में बेरोजगारी… Read More
PUC Certificate: भारत में Car, Motorcycles या किसी अन्य प्रकार के वाहन को कानूनी रूप… Read More
Post Office PPF Account 2024: भारत के सबसे बड़े और सबसे पुराने संस्थानों में से… Read More
MP Scholarship Portal 2.0: मध्य प्रदेश सरकार एक ऑनलाइन पोर्टल लेकर आई है जिसके माध्यम… Read More