मागासवर्ग आयोगाचा सर्वे तुमच्या भागात सुरु झाला का ? काय असतील सर्वे ची प्रश्न? Manoj Jarange Patil | Maratha Reservation Survey

  • Manoj Jarange Patil | Maratha Reservation Survey:
  • तुमच्या समाजात विधवा स्त्रियांना कपाळाला कुंकू लावण्याची परवानगी आहे का?
  • लग्न झालेल्या स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतलाच पाहिजे असा कुठला नियम आहे का? 
  • जागरण गोंधळ किंवा इतर कुठल्या विधींसाठी कोंबडा किंवा बोकड कापण्याची पद्धत आहे का? 
  • हे आणि असे एकूण 154 प्रश्न विचारून आता महाराष्ट्रात एक सर्वे केला जाणार आहे. 

राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाचे मागासले पण सिद्ध करण्यासाठी, मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. 

आता या सर्वेक्षणात नेमके कोणते प्रश्न विचारले जातील? Manoj Jarange Patil | Maratha Reservation Survey 

या कामाच्या मोबदल्यात कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळतील, आणि या सर्वेक्षणामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेता येऊ शकतो का? 

या सगळ्याबद्दल खालील लेखात जाणून घेऊ:

सरकार कडून समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न झाले म्हणून वारंवार हे आरक्षण न्यायालयात कायद्याच्या कसोटीवर टिकू शकले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा (Empirical Data) गोळा करणे आवश्यक असल्याचा समोर आलं. 

यानंतर मागासवर्ग आयोगाने या सर्वेक्षणासाठी एक प्रश्नावली निश्चित केली आहे त्यानुसार एकूण पाच प्रकारचे प्रश्न विचारले जातील, आणि हे सर्व Module मध्ये विभागणी केली जाणार आहे

Module A मूलभूत माहिती:-

नाव
पत्ता
गाव / शहर
तालुका 
जिह्वा
गाव दुर्गम भागात आहे का ?
आधार कार्ड नंबर ?
मोबाईल क्रमांक 
वर्गवारी जात ?
प्रवर्ग ?
तुम्ही मराठा आहेत का ?
नसल्यास जात कोणती ?
Maratha Reservation Survey Form

यातल्या Module A मध्ये तुमच्या कुटुंबाची मूलभूत माहिती तुमचं नाव, पत्ता, तुम्ही मराठा आहात का?  नसला तर तुमची जात कोणती असे एकूण 14 प्रश्न विचारले जातील.

Model B कुटुंबाचे प्रश्न 

  • तुम्ही कोणता घरात राहता? 
  • तुमचं कुटुंब संयुक्त आहे की विभक्त? 
  • तुमच्या जातीचा पारंपारिक व्यवसाय कोणता? 
  • सध्या तुम्ही काय करता? 
  • कुटुंबात लोकप्रतिनिधी आहेत का?  असे एकूण वीस प्रश्न असतील. 

Model C आर्थिक स्थिती

  • तुमच्या घरात शौचालय आहे का? 
  • शेती आहे का असेल तर ती कोणाच्या नावे आहे ?
  • कुटुंबावर किती कर्ज आहे? 
  • मागच्या पंधरा वर्षात तुम्ही स्थावर मालमत्ता विकलीये का ?
  • तुमच्या कुटुंबातील एखादी महिला इतरांच्या घरी दोन्ही भांडी स्वयंपाक अशी काम करते का ?
  • असे एकूण 76 प्रश्न याच्यात असतील.

Model D सामाजिक मागासलेपण

  • तुमच्या समाजात हुंडा देण्याची पद्धत आहे का? 
  • विधवा स्त्रियांना मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का? 
  • तुमच्या कुटुंबात मुलांच्या लग्नाचा निर्णय कोण घेत? 
  • गेल्या दहा वर्षात तुमच्या कुटुंबातल्या कुणी आत्महत्या केले का? 

असे एकूण 33 प्रश्न असतील 

Module E कुटुंबाचे आरोग्य

या  Module E  मध्ये कुटुंबाच्या आरोग्याबाबत अकरा प्रश्न विचारले जातील, असे एकूण 154 प्रश्न विचारून तुमचं कुटुंब सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास आहे की नाही हे ठरवलं जाईल. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यातल्या मराठा समाजाचे मागासले पण तपासण्याचं काम हातात घेतलं. 

त्यासाठी राज्यातल्या सगळ्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या मराठा आणि खुल्या प्रवर्गातल्या नागरिकांचं सर्वेक्षण होतंय. पुणे महापालिका आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार हे सर्वेक्षण 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या आठ दिवसांच्या काळात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या गेल्यात. 

राज्यातल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाची संख्या पाहता हे सर्वेक्षण इतक्या कमी कालावधीत पूर्ण करणं हे शासकीय यंत्रणे समोरच एक मोठा आव्हान असणार आहे. या कामात पुण्याच्या (Gokhale Institute) ची सुद्धा शासनाने मदत घेतली. 

हे सर्वेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षक आणि प्रगणकांची नेमणूक केले जातील. या कामासाठी अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन देण्याची गरज आहे. यासाठी जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त उपजिल्हाधिकारी तहसीलदार आणि या कामासाठी नियुक्त करण्यात येणार आहेत. 

वर्ग दोन किंवा त्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम ही मानधन म्हणून दिली जाईल. हे सर्वेक्षण करण्यासाठी पर्यवेक्षक आणि प्रग्नकांना प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातील. 

राज्य मागासवर्ग आयोगाने 31 जानेवारीपर्यंत हे सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश दिलेत त्यावरून हे स्पष्ट होतं की मनोज जरांगे यांनी दिलेल्या 26 जानेवारी पर्यंतच्या मुदतीत हे सर्वेक्षण पूर्ण होणार नाही. 

जरांगेंनी मुंबईला येऊ नये यासाठी सरकार अजूनही प्रयत्न करत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment