खुशखबर टाळगाव चिखली वासियांसाठी खुशखबर :टाळगाव चिखली गावाला आता क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे.
संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान आणि सर्वात मोठे तीर्थस्थान म्हणून प्रसिद्ध देहू जवळील चिखली म्हणजेच टाळगाव चिखली आणि आळंदी यांच्या मधोमध वसलेले गाव म्हणजे टाळगाव चिखली गाव या गावाला आता क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा प्राप्त झाला आहे यामुळे गावात सर्व सोयी सुविधा भक्कम होण्यास मदत होईल असा विश्वास भाजपा आमदार महेश दादा लांडगे यांनी व्यक्त केला आहे.
Maharashtra Berojgar Batta Yojana 2024: ऑनलाइन नोंदणी, बेरोजगारी भत्ता महाराष्ट्र
टाळगाव चिखली क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याबाबत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वात दिनांक 19 मे 2023 रोजी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घोषणा करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त यांना पत्राद्वारे कळवले आहे.
पैलवान आमदार महेश दादा लांडगे पुढे असे म्हणाले जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन झाले त्यावेळी त्यांनी टाळ चिखली येथे त्यांचे टाळ चिखली येथे पडले होते, त्यामुळे गावाला टाळगाव चिखली असे नाव पडले असे सांगितले जाते.
त्या घटनेचे साक्षर असलेले टाळ मंदिर आजही चिखली गावात आहे तसेच महाराजांच्या 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी चिखली गावातील होते. इंद्रायणी काठी वसलेल्या गावाला तटबंदी होती. ग्वाल्हेरचे देवराम कृष्णराव जाधव यांची गडी सुद्धा आहे, त्यामुळे गावाला धार्मिक ऐतिहासिक आणि वारकरी वारकरी संप्रदायाचा उच्च असा वारसा लाभलेला आहे. गावात श्री भैरवनाथ हे जागृत देवस्थान म्हणून पंचक्रोशीत परिचित सुद्धा आहे.
टाळगाव चिखली मध्ये मुख्य आकर्षण म्हणजे संतपीठ या संतपीठाची ख्याती महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालेली आहे.
चिंचवड महानगरपालिका च्या प्रशासनाच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील पहिले श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत पीठ स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज टाळगाव चिखली येथे उभारण्यात आले आहे.
टाळगाव चिखली गावाचा इतिहास:
1997 मध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत गावाचा समावेश झाला असून 2017 मध्ये भारतीय जनता पार्टीचे सत्ता काळात चिखली आणि परिसरात परमवीत विकास कामांना गती मिळाली आता क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा मिळाल्यामुळे पायाभूत सुविधा आणखी भक्कम होण्यास मदत होईल असा विश्वासही आमदार महेश दादा लांडगे यांनी व्यक्त केला
Post Office Time Deposit Scheme 2024: इंडिया पोस्ट द्वारा पेश किए जाने वाले सबसे प्रसिद्ध… Read More
Post Office RD Scheme 1000 Per Month: सुरक्षित निवेश के साथ बेहतरीन रिटर्न देने के… Read More
MP Berojgari Bhatta Yojana 2024: जैसा कि आप सभी जानते हैं हमारे देश में बेरोजगारी… Read More
PUC Certificate: भारत में Car, Motorcycles या किसी अन्य प्रकार के वाहन को कानूनी रूप… Read More
Post Office PPF Account 2024: भारत के सबसे बड़े और सबसे पुराने संस्थानों में से… Read More
MP Scholarship Portal 2.0: मध्य प्रदेश सरकार एक ऑनलाइन पोर्टल लेकर आई है जिसके माध्यम… Read More